vidyaविद्या हर्डीकर सप्रे

शिक्षणाने वैज्ञानिक, व्यवसायाने संगणकतज्ञ, वृत्तीने साहित्यिक आणि सामाजिक कार्यकर्ती. साहित्यात समाजाचे प्रतिबिंब पडते, तशी समाजात सामाजिक कार्याबद्दल जागृती निर्माण करण्याची ताकद साहित्यात असते. या ताकदीचा उपयोग आपल्या लेखनात जाणीवपूर्वक करण्याचे प्रयत्न. त्यामुळे साहित्य प्रवास , सामाजिक कार्य आणि बृहन्महाराष्ट्र मंडळाचे कार्य हे एकमेकात गुंफलेले आहे. त्याचा प्रवास “संवादने”, आणि “अमेरिकन मराठी: जन मन अधिवेशन” यां पुस्तकात प्रतिबिंबित झाला आहे. महाराष्ट्र फौन्डेशन, एकल विद्यालय अशा अनेक संस्थांच्या कामात विद्याने पुढाकार घेतलेला आहे. आणि ‘एक मराठी मंडळ: एक गाव दत्तक’ या मोहिमेचा प्रसार ती करत असते.
उत्तर रंग: उत्तर अमेरिकेतील भारतीय आणि विशेषत: मराठी लोकांच्या उत्तर आयुष्याचा विचार करण्यासाठी असलेल्या डॉक्टर अशोक सप्रे यांनी संस्थापित आणि सुस्थापित केलेल्या उत्तर रंग या उपक्रमात विद्याचा अनेक भूमिकातून सहभाग असतो. उदा: परिषदा, मेळावे, चर्चासत्रे, स्मरणिका, उत्तररंग नामदर्शिका.
• ‘आभां’ ( आश्रम फॉर अमेरिकन भारतीय) हा लेख २००१ च्या बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या अधिवेशन स्मरणिकेत लिहून या उत्तर रंग संकल्पनेचा परिचय मराठी समाजाला करून दिला. या लेखात भारतीयांच्या निवृत्त वसाहतीचे भविष्यदर्शी चित्रण केले आहे. बृहन्महाराष्ट्रवृत्तात २००४ पासून उत्तर रंग हे सादर चालविण्यात सहभाग अनेक अधिवेशन स्मरणिकामध्ये या विषयावर लेखन व जागृतीसाठी प्रयत्न चालू असतात.
• उत्तररंग कार्यक्रमात ‘स्त्रियांच्या दृष्टिकोनातून निवृत्ती नियोजन’ आणि आयुष्याच्या उत्तर रंगात सामाजिक कार्य कसे करता येईल’ या दोन विषयांवर विशेष भाष्य करण्याकडे विद्याचा भर असतो.
• २०१५: अधिवेशनास जोडून उत्तर रंग ही स्वतंत्र एक दिवसाची परिषद घडवून आणण्यात अधिवेशन सल्लागार या नात्याने विद्याचा पुढाकार होता.
• उत्तर रंग: ही संकल्पना व चळवळ २००७ मध्ये बृ म मंडळाचा भाग बनवण्यात बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या सल्लागार समितीची अध्यक्ष या नात्याने पुढाकार व पुढील बोधवाक्य रचण्यात सहभाग:
एकमेकांचे धरुनी हात | सुखशान्तीची शोधू वाट || चला राहू आनंदात | आयुष्याच्या उत्तररंगात ||
१९९९च्या बृहन महाराष्ट्र अधिवेशनात व २०१२ मध्ये मराठी मंडळ लॉस एन्जेलिस चे समाजसेवेबद्दल सन्मान
२००१च्या बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या अधिवेशनात ‘साहित्यक्षेत्रातला सन्मान’.