Sur Sargam

गाण्यांच्या स्पर्धा होतात, विजेते घोषित होतात, स्पर्धक प्रेक्षकांना त्यांच्या गाण्याच्या प्रेमात पाडतात. पण पुढे क्वचितच आपल्या त्या लाडक्या गायकांची गाणी आपल्याला ऐकायला मिळतात. यावेळी BMM 2017 मध्ये प्रथमच BMM सारेगमप विजेत्यांचा गाण्यांचा कार्यक्रम आपण आयोजित केला आहे. ‘सूर सरगम’ ही कुठल्याही प्रकारची स्पर्धा नसून केवळ एक निखळ मनोरंजनाचा कार्यक्रम आहे.

रसिक प्रेक्षकांचे कान तृप्त करायला जमणार आहेत BMM सारेगमप stars! अमेरिकेतल्या उगवत्या ताऱ्यांच्या आवाजात भावगीते, भक्तिगीते, सुगम संगीत, नाट्यसंगीत, लावणी..आणि आणखी बरंच काही! एवढंच नव्हे, तर साथीला असणार आहे झी मराठी सारेगमपचा वाद्यवृंद, The MuZeecians! अजून काय पाहिजे! भेट द्या