Moruchi Mavashi (मोरूची मावशी)

एकाहून एक सरस असे कार्यक्रम भारतातून आणि अमेरिकेतून BMM 2017 अधिवेशनासाठी येणार आहेत. मग खुद्द डेट्रॉईटमधील नाट्यसंस्थेचा कार्यक्रम नाही असं कसं होईल? रणांगण, पुरुष, निष्पाप, शिकार, प्रयाणोत्सव अशी एकाहून एक दर्जेदार नाटकं सादर करून रसिकांच्या पसंतीला पात्र ठरलेली डेट्रॉईटची नाट्यसंस्था ‘नाट्यगंधार’ आपणासाठी घेऊन येत आहे प्र. के अत्रे लिखित धम्माल विनोदी नाटक “मोरूची मावशी”. आचार्य अत्रेंचे कालातीत विनोद, नाट्यगंधारचे यशस्वी दिग्दर्शक चैतन्य पुराणिक यांचे काळानुरूप दिग्दर्शन आणि नाट्यगंधारच्या कलाकारांची समर्थ साथ यातून तयार झालेला अफलातून प्रयोग प्रेक्षकांना नक्कीच आवडेल याबद्दल आमच्या मनात तिळमात्र शंका नाही.

तर पाहायला या, आत्तापर्यंत अमेरिकेतल्या अनेक शहरांत यशस्वी प्रयोग केलेले, प्रेक्षकांना पोट धरून हसायला लावणारे, प्रख्यात दिग्दर्शक विजय केंकरे यांनी गौरवलेले नाट्यगंधार निर्मित विनोदी नाटक “मोरूची मावशी”!!