माऊली ( Mauli )

BMM २०१७ च्या सोहळ्यात शिकागो महाराष्ट्र मंडळ सहर्ष सादर करत आहे “माऊली”; संत ज्ञानेश्वर यांचं जीवन आणि योगदान उलगडून दाखवणारी एक नृत्य नाट्य संगीतिका .
संत ज्ञानेश्वर हे आपल्या महाराष्ट्रातील एक थोर संत! अवघ्या १६ व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहून त्यांनी आपल्या सर्वांना सहज, साधं, आणि आनंदी जीवन जगायचा मार्ग दाखवला. संत ज्ञानेश्वरांचं आयुष्य उणंपुरं २१ वर्षाचं! खडतर, परंतु अतिशय प्रेरणादायी! जाच, उपेक्षा, करुणा, भक्ती, योग, अध्यात्म, आणि अनेक गूढ चमत्कार, या सर्वांनी नटलेलं! त्यांच्या जीवनाचं आणि तत्त्वज्ञानाचं सार आम्ही पारंपारिक गाणी, नृत्य, नाट्यमय प्रसंग, वेशभूषा, आणि खूप सारे special effects यातून उलगडून दाखवणार आहोत.

पटकथा – सुप्रसिध्द लेखिका, निवेदिका आणि कवयित्री मंजिरी धामणकर
निर्मिती: महाराष्ट्र मंडळ शिकागो
निर्मिती सहाय्य: संदिप गाडगीळ, विद्या जोशी आणि कल्पना निमकर
दिग्दर्शन: रंगभूमी आणि सिनेजगतातील सुप्रसिद्ध अभिनेत्री अनुपमा धारकर
कलाकार: शिकागोचे गुणी कलाकार

The Maharashtra Mandal of Chicago proudly presents “Maauli”; a beautiful musical dance drama based on the life and contribution of Sant Dnyaneshwar at BMM 2017.
Sant Dnyaneshwar is a leading proponent of the tradition of devotion in the pantheon of Marathi Saints. At a young age of 16, he wrote his famous ‘Dnyaneshwari’ in Marathi that made the abstruse ‘Bhagwad Geeta’, written in Sanskrit, accessible to the public. His words and teachings extol the virtue of a simple and happy life. While short, his life is a dramatic story of poverty, neglect, insult, devotion, coincidence and miracles. With the help of special effects music, dance, short scenes and costumes we take you through his spiritual journey

Screenplay by: Well-known writer and orator Manjiri Dhamankar
Produced By: Maharashtra Mandal of Chicago
Production Assistants: Sandip Gadgil, Vidya Joshi and Kalpana Nimkar
Director: The famous stage and screen actress Anupama Dharkar
Cast: The talented and versatile artists of Chicago