'दिल से…. एक काव्यानुभव' ( Dil se…ek Kavyanubhav )

प्रस्तुतीकरण : विवेक गुळवणे, उमा आठले , मेधा दाते , प्रकाश दाते

कवीच्या हृदयात कल्पना जन्मते अन ती रसिकांच्या मनात घर करते..
त्या प्रक्रियेची अनुभूती देण्याचा मानस !

हेतू अगदी साधा -सोपा आहे. मराठी-काव्यसमूहाची समृद्धता, सखोलता, आणि सौंदर्य आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर समजून घ्यायचे आणि आनंद लुटायचा. मराठीतील कविता आणि कवी, ह्यांच्या विविधतेला तर तोडच नाही. जुन्या- नव्या, गद्य-पद्य, उडत्या-उपरोधिक, हळव्या-हास्य कविता आणि बा. भ. ते संदीप, भाऊसाहेब पाटणकर ते अशोक नायगांवकर, गदिमा ते नाना ह्यासम दिग्गजांची अलौकिक प्रतिभा ! त्या आविष्कारांची लयलूट करायला आणि रसग्रहण करायची मजा काही औरच असते, नाही ?
एका वेगळ्याच धाटणी वर रचलेला हा कार्यक्रम श्रोतेजनाच्या मनाशी नक्कीच संवाद साधेल… अगदी दिलसे !!!
सादर करत आहोत BMM 2017 ग्रँड रॅपिड्स मिशिगन येथे

Presenters: Vivek Gulvane, Uma Athale, Medha Date, Prakash Date


‘Dil se…ek Kavyanubhav’, a presentation to experience the Poetry, the soulful thought that travels from the Heart of a Poet to the Reader’s Heart!!

The idea is to enjoy and savor the Marathi poetry, its richness, its profound depth and tremendous density in a very simplistic format. Through the friendly chats the program touches the old- new, classic-modern, prose-verse, humorous-sentimental, rich and elegant extracts from our Marathi Poetry.
This interesting and innovative concept will surely connect the audience .. Dil se!
Presenting at BMM 2017 at Grand Rapids, Michigan