Black Game

ब्लॅक गेम,
कलानिर्मिती, वॉशिंग्टन डिसी

“बालक पालक” फेम लेखक अंबर हडप यांची खिळवून ठेवणारी संहिता! अमेरिकेतील अनेक नाट्य संमेलने गाजवलेली, अभिनय, विनोद, दिग्दर्शन यांसाठी वाखाणली गेलेली एकांकिका ..ब्लॅक गेम! बघायला नक्की या! सुरुवात चुकवू नका, शेवट सांगू नका!
मिट्ट काळोखी रात्र, एकांतात असलेलं घर! ते सगळे त्या घरात का भेटले आहेत? हि सारा कोण आहे? तिचं नक्की काय झालं? जेव्हा काळी जादू, भूत-प्रेत उपस्थित असतं तेव्हा काहीही घडू शकतं! उत्तरे मिळण्यासाठी बघा थरारनाट्य… ब्लॅक गेम!

कोण कुठला, कुठून आला
कशास येउन, खेळ मांडीला
फांस पडिला, जीवास घाला
घडून जाइल, एक Black Game


भयाण आहे, काळी रात्र,
संशयित आहेत, सारीच पात्र
हटेल जरी, नजर क्षणमात्र
घडून जाइल, एक Black Game